रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण : निकाळजे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण : निकाळजे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

वागदरी ,दि.१५:एस.के.गायकवाड

आंबेडकरी चळवळीतील स्मृतिशेष शिवाजी पंडा निकाळजे रा. दिंडेगांव ता.तुळजापूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्रांनी परंपरेने चालत आलेली *अंत्यविधीच्या तिसऱ्या दिवशी नदीत केले जाणार्‍या रक्षाविसर्जनाला* फाटा देत आपल्या वडिलांनाच्या अस्थी रक्षाविसर्जन आपल्या शेतात एक फळांचे झाड लावून व्रक्षारोपनाने करून समाजापुढे एक आदर्श घातला आहे.


 आपण नेहमी जलप्रदूषणावर बोलतो, लिहतो, ऐकतो जलप्रदूषणामुळे होणारे तोटेही माहिती असतात *परंतू  परंपरेने चालत आलेल्या रुढी च्या विरुद्ध कृतीला सहसा कुटुंबियांचे मन धजावत नसते*.
 परंतू दिंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच गोपीचंद निकाळजे व खंडू निकाळजे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या शेतजमिनीत फळाचे झाड लावून व्रक्षारोपनाच्या खड्ड्यात रक्षाविसर्जन करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.


अशा कृतीमामागची भूमिका स्पष्ट करतांना *दिंडेगांवचे उपसरपंच गोपी निकाळजे व त्यांचे बंधू खंडू निकाळजे* यांनी सांगितले की, *आमचे वडिल वृक्षाच्या रुपाने चिरंतन जीवंत असल्याची जाणीव क्षणोक्षणी आम्हा कुटुंबियांना होईल.तसेच हा वृक्ष वडिलांच्या स्मृतित लावला गेला असल्याने घरातील प्रत्येकजण त्याची विशेष काळजी घेवून जोपासेल* तसेच दिवसेंदिवस वृक्षाप्रतीचा आदर कमी होत असल्याने बेसुमार वृक्षतोड होते परंतू अशाप्रकारे *घरच्या व्यक्तीच्या आठवणीत वृक्षारोपण केल्यामुळे कुटुंबियांना त्या वृक्षाप्रती एक वेगळाच आदरभाव निर्माण होईल यामुळे त्या झाडाची फांदी तोडण्याअगोदर घरातील प्रत्येकजण हजारदा विचार करेल, अशामुळे खूप काही  सकारात्मक विचार वृक्षासंदर्भात निर्माण होतील .घरातील लहान मुलांमध्ये सुद्धा वृक्षसंवर्धनाबद्दल सकारात्मक बदल घडून येईल.असे अतिशय पर्यावरणवादी विचार गोपीचंद निकाळजे व खंडू निकाळजे यांनी मांडले. खरोखरच प्रत्येकांनी असा पथदर्शी हा स्तुत्य उपक्रम सुरू करायला हवा. आपल्या कुटुंबियातील व्यक्तीच्या निधनानंतर ही ती व्यक्ती  वृक्षरुपाने जीवंत राहिल..

शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ; श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

                                 

शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ
श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

धाराशिव, दि.15 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री.तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारिक पध्दतीने श्री.तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज सपत्निक विधिवत घटस्थापना करण्यात आली.
 मंत्रोपच्चाराने तसेच आई तुळजाभवानी उदो-उदोच्या जयघोषात पारंपारिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
   
  
घट कलशांची पारंपारिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तीर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. 
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.shrituljabhavani.org ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सुलभ दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
    
यावेळी श्री.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अर्चनाताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन)सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, धार्मिक अधिकारी काटकर,महंत तुकोजी बुवा,महंत वाकोजी बुवा, चिलोजी बुवा,डॉ. अक्षय पाटील तसेच पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ व भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी  उपस्थित होते. 
          

८५ महाविद्यालयांतील १७७ मुले व मुलीनी आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सादर केले नेञदिपक डावपेच

 

८५ महाविद्यालयांतील १७७  मुले व मुलीनी  आंतरमहाविद्यालयीन कुस्ती  स्पर्धेत सादर केले  नेञदिपक डावपेच

नळदुर्ग ,दि.१५ :प्रा. दिपक जगदाळे  

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती ( पुरुष व महिला )  स्पर्धेचा  समारोप करण्यात आला. दि. १३ व १४ या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या  ८५ महाविद्यालयांतील १३३ मुले व ४४ मुलीनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच कुस्तीपटूनी कुस्तीतील कोशल्यपूर्वक डावपेच दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले .

दि.13 व 14 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या पुरुष व महिला  कुस्ती स्पर्धेचा निकाल  खालील प्रमाणे  ( मुले ) - ( 57 किलो वजन गट )  स्वप्निल शेलार , ऐ. डी. कॉलेज , कडा ( प्रथम ) शंकर गावडे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय , तुळजापूर ( द्वितीय ) ( 61 किलो  वजन गट ) सौरभ इगवे  बी . एस. एस. कॉलेज माकणी ( प्रथम ) विशाल गावडे,तुळजापूर ( द्वितीय )  65 किलो , साहिल सय्यद, आष्टी ( प्रथम ) रोहित भोसले,कळंब ( द्वितीय ) 70 किलो गणेश शेटे,धानोरा ( प्रथम ) प्रतिक काळे ,  आष्टी ( द्वितीय ) 74 किलो शिवम थोरात,चौसाळा ( प्रथम ) सौरभ शिंदे,कडा ( द्वितीय )79 किलो ऋषिकेश भोसले,नळदुर्ग ( प्रथम )संदीप काटकर,जालना ( द्वितीय )  86 किलो रविराज निंबाळकर,परांडा ( प्रथम ),संभाजी देवकर,बीड ( द्वितीय ) 92 किलो सोमनाथ कोरके, बनसारोळा ( प्रथम) अनिकेत खंदारे,कडा ( द्वितीय ) 97 किलो विकास धावरे,आष्टी ( प्रथम ) ,जीवन भुजबळ,माकणी ( द्वितीय ) 125 किलो धीरज बारस्कर,परांडा  ( प्रथम ),सावंत.आर ( द्वितीय ) ( मुली ) - 50 किलो वजन गट कु. समृद्धी खांडवे, बिडकीन ( प्रथम) कु. यशोदा क्षीरसागर, ढोकी ( द्वितीय ) 53 किलो कु. पंकजा बल्लाळ, पैठण ( प्रथम ) कु. पल्लवी सुपनवर, आष्टी ( द्वितीय ) 55 किलो कु.  कल्याणी दसपुते, पैठण ( प्रथम ), कु. चैताली गिव्हुले, धानोरा ( द्वितीय ) 57 किलो कु. श्रुती बामनहोत, छत्रपती संभाजीनगर  ( प्रथम ) 59 किलो कु. स्नेहल पुजारी,धानोरा  ( प्रथम ) , कु. दिक्षा गायकवाड ,आष्टी ( द्वितीय ) 62 किलो कु.संजना डिसले,धानोरा ( प्रथम ), कु. भाग्यश्री धुमाळ B.P.Ed कॉलेज ( द्वितीय ) ,  कु.सोनाली सरक नळदुर्ग ( तृतीय ) 65 किलो  कु. श्रृंखला रत्नपारखी,छत्रपती संभाजीनगर  ( प्रथम ) कु. शिवाली पाटील,रुईभर ( द्वितीय ) 68 किलो  कु . लक्ष्मी पवार, छत्रपती संभाजीनगर ( प्रथम ) कु. धन्या पोळ,आष्टी ( द्वितीय ) 72 किलो  कु. कांचन थोरवे,जालना ( प्रथम )  , कु. तृप्ती जगदाळे,राजनगड ( द्वितीय ) 76 किलो  कु. वेदिका ससाने,धानोरा  ( प्रथम )  कु. प्रतीक्षा गायकवाड,छत्रपती संभाजीनगर ( द्वितीय ) इत्यादी.

सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरीता संस्थेच्या  सर्व पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्य डॉ . सुभाष राठोड , उपप्राचार्य  डॉ . रामदास ढोकळे प्रा. चांदसाहेब कुरेशी , कार्यालयीन आधिक्षक धनंजय  पाटील,क्रिडा शिक्षक डॉ अशोक कांबळे  व डॉ कपिल सोनटक्के , आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले .   


शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयांचे मोफत वाटप


नळदुर्ग, दि. १६ :

   शिवराय मनामनात—शिवजयंती घराघरात हा  संकल्प  करुन  युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने ऐतिहासिक नळदुर्ग शहरात 101 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन हा कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यात दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

   

युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांनी नळदुर्ग येथे गेल्या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुढच्या वर्षी नळदुर्ग शहरामध्ये घराघरात शिवजयंती साजरी व्हावी यासाठी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने 101 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची पुर्तता करून कफील मौलवी यांनी नळदुर्गवासीयांना दिलेला शब्द पाळला आहे.


हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात हा संकल्प घेऊन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने या वर्षी नळदुर्ग शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे 101 पुतळे घरगुती पुजेसाठी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन खासदार ओमराजे निंबाळकर, राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार ज्ञानराज चौगुले, लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, राजेंद्र मिरगणे हे उपस्थित राहणार आहेत. तर भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शहाजी पवार, उद्योजक  दत्तात्रय मुळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अनिल गोटे,  तहसिलदार सौदागर तांदळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड. अनिल काळे, सोलापुरचे गड संवर्धन समितीचे आनंद देशपांडे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, सुहास येडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शफी शेख, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळात शपथविधीचा शिंदे गट शिवसैनिकांनी केला




उस्मानाबाद , दि. ०९

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये  परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजी सावंत यांची मंत्रपदी वर्णी लागल्याबद्दल उसमानाबाद येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा सेनेचे राज्य विस्तारक  सुरज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मिठाई वाटून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

महाराष्ट्रात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर उस्मानाबाद  जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यामध्ये परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रा.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. आज (दि.9) जाहीर झालेल्या मंत्रिमंडळात प्रा.तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा.तानाजीराव सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे वृत्त  शहरात धडकताच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 


यावेळी शिवसेनेचे युवक नेते अजित लाकाळ, नामदेव निकम, श्रीनिवास लाकाळ, नाना सूर्यवंशी, मधुकर झाल्टे, रामा घोगरे, प्रणिल रणखांब, ज्ञानेश्वर ठवरे, राहुल मोरे, आकाश माळी, महेश मगर, रणजित चौधरी, अविनाश टापरे, गगन आगलावे, सुरज राऊत, गणेश जाधव, योगेश तुपे, महेश महानवर, राकेश ठवरे, अविनाश कदम, महेश देवकते, ओंकार मैराण, बबलू वंडरे, अक्षय देवकते, सचिन मडके, दिनेश तुपे, बबलू नवले, अजय भगत, महादेव आगलावे, संतोष देवकर यांच्यासह युवा सैनिक  उपस्थित होते.

महिला आरक्षणासाठी शरद पवार यांचे महत्वाचे योगदान


काटी , दि . १३ : उमाजी गायकवाड

 काटी ता. तुळजापूर येथे रविवार दि. 12 जुन रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  ग्रामीण भागात पक्षाची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला.


राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तुळजापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते महेंद्र धुरगुडे आदीची प्रमुख   उपस्थिती होती.  
     

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते मोदी लाटेत भाजपवाशी झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षवाढीवर भर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक समस्या सोडविण्यासह गावपातळीवर संघटन करण्यास कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच येथील इंदिरा नगर व बसस्थानकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घघाटन करण्यात आले.
       

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की,   राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आमचे नेते असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर महीला आरक्षणासाठी शरद पवारांचे महत्वाचे योगदान असून त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता येणे शक्य झाले. शरद पवार यांनी जातीय वादाला कधीही थारा दिला नाही हे खुद्द भाजपचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीच मान्य केले आहे. हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याने राहत आहेत.  


भविष्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी वज्रमूठ बांधून  उत्साहात कामाला सुरुवात करण्याचे आवाहन केले.
   

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, मज्जीद, मंदीर यावरील भोंगे काढा, हनुमान चालीसा कोणाच्या दारापुढे जाऊन म्हणा हे नवीन फॅड निघाले असून भाजपच्या वाचाळवीरामुळे जागतिक पातळीवर नाचक्की होत आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. येथील स्थानिक कामे, समस्या सोडविण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. 
        

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष अशोक जाधव, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष विनोद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे,  दिनकर पवार, शाखाध्यक्ष धनाजी गायकवाड, उपाध्यक्ष रामेश्वर लाडुळकर, वक्तासेल तालुकाध्यक्ष त्रिगुणशील साळुंके, बबन हे्डे, अप्पा बनसोडे, जुबेर शेख, नजीब काझी, बाळु क्षिरसागर,अशोक राऊत,काकडे आदींसह वडगाव (काटी), सावरगाव, केमवाडी,वाणेवाडी आदी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

शहीद जवान दत्ता वाघमारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

काटी: , दि . १३ : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील  शहीद जवान दत्ता लक्ष्मण वाघमारे यांच्या पार्थिवावर सोमवार दि. 13 रोजी दुपारी 4:30 वाजता  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी ‘शहिद जवान दत्ता वाघमारे अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’ अशा घोषणांनी माळुंब्रा परिसर दणाणून गेला. पुणे येथे कर्तव्यावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवार दि.12 रोजी निधन झाल्याने त्यांना  हौतात्म्य प्राप्त झाले. शहीद दत्ता वाघमारे यांनी 101 इन्फंट्री मराठा बटालियन आणि डिफेन्स सेक्युरिटी फोर्समध्ये अशी एकूण 30 वर्षे देशसेवा केली.


सोमवारी दुपारी 3:15 वाजता  त्यांचे पार्थिव पुणे येथून रुग्णवाहिकेतून माळुंब्रा येथे  आणण्यात आले. शहीद जवान दत्ता वाघमारे यांना सैन्यदलात भरती होण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन देऊन सैन्यदलात भरती केले ते माळुंब्र्याचे सुपुत्र सैन्य दलातील सुभेदार लक्ष्मण उत्तम वडणे यांनीच शहीद दत्ता वाघमारे यांचे पार्थिव गावात आणले. यावेळी गावातील वातावरण शोकाकुल बनले होते.


वीरमाता अनुसया वाघमारे, वीरपत्नी ज्योती, मुलगा अजय वाघमारे यांच्यासह, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तथा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी, आप्तस्वकीयांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.यावेळी सैन्य दल व पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या पाच फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शहीद दत्ता वाघमारे यांचे चिरंजीव अजय वाघमारे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुख अग्नी दिला. यावेळी  नागरिकांची  उपस्थिती होती.

तामलवाडी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी

                                                                   .                             
तामलवाडी:- दि ११ 

येथील जिजाई माऊली मंगल कार्यालय तामलवाडी ता .तुळजापूर  येथे चर्मकार  समाजाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 494 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.                                       

याप्रसंगी समानतेच्या तत्त्वांची मांडणी करणारे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत आपल्या भक्तिमार्गातून मातृ-पितृ सेवा व स्त्री पुरुष समानता तसेच अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती व खरी भक्ती तसेच मानव जीवन कसे जगावे याचे प्रबोधन करणाऱ्या  संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.                              

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव, तामलवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच  ज्ञानोबा राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे,  विशाल राऊत,  बाळासाहेब कांबळे, रामेश्वर कांबळे, विकास कांबळे , सहदेव हब्बु , गुंडू बनसोडे, श्रीकांत कांगडे , शत्रुघ्न  राऊत ,किशोर बनसोडे,  तानाजी पवार,पोपट चव्हाण, आबा रणसुरे, शीलवंत चौगुले, विशाल कसबे, सचिन माळी, सुदाम म्हेत्रे ,आदीसह  समाज बांधव उपस्थित होते.

नभ आले दाटून....

दाटून आले ढग पहा हे 
आमची शाळा सुटली..
स्कुल बस आणि युनिफाँर्ममध्ये
अशी मजा कुठली?...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्‍या 67 व्या वर्धापन दिनानिमित्‍त उस्‍मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.